Blog

Ketan Pathak Blog

चार स्तंभांची एक-नाळ !

जवळजवळ आठ वर्षांनी स्वत:साठी लिहिण्याचा योग आलाय्. सरकारनामाने एका वेगळ्या विषयाच्या निमित्ताने ही संधी दिली, त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. पत्रकारितेत पाऊल ठेवले, ते ज्येष्ठ संपादक ल. त्र्यं. जोशी यांनी संधी दिल्याने. तत्पूर्वी ‘संपादकांना पत्रे’ किंवा ‘वाचकांचे मनोगत’ सारखे लेखन होत असायचे. अशाच एका भेटीत अक्षरं आणि भाषा आवडल्याने थेट नोकरीचा प्रस्ताव आला. पदवीचं शिक्षण…

‘स्वार्थसाधना की आंधी मे…’

(5 सप्टेंबर 2011 रोजी प्रकाशित लेख)या देशातील जनता निश्चितपणे गरीब असेल पण हा देश गरिबांचा नाही, असे म्हटले जाते ते काही उगाच नाही. स्विस बँकेत जेव्हा भारतीयांनी खोर्‍याने पैसा जमा केला तेव्हा हीच प्रतिक्रिया तेथील अर्थतज्ञांकडून आली होती. भारताचे करोडपती असणे हे लोकसंख्येच्या दृष्टीने असेल. कोटीचे शतक पूर्ण करून आता आपण केव्हा एकदा दीडशे कोटीवर…

कान टोचायचे कुणी?

(14 नोव्हेंबर 2011 रोजी प्रकाशित लेख)कान कुणाच्या हाताने टोचले जावे, असा प्रश्न विचारला तर पटकन उत्तर मिळते, सोनाराकडून. दुसर्‍या कुणाकडून ते टोचले तर कदाचित त्यात काही त्रुटी राहू शकते. भारतातील विरोधी पक्ष आज एका सूरात केंद्रातील डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या अकार्यक्षमतेचा पाढा वाचत असताना त्यात कदाचित राजकारणाचा वास येऊ शकतो. पण, देशातील आघाडीचे सारेच उद्योजक जेव्हा…

राहुल आजोबा

(27 ऑगस्ट 2011 रोजी प्रकाशित लेख)भ्रष्टाचाराविरोधात देशाभरातील तरूण रस्त्यावर उतरला असताना ज्यांच्याकडून भावी नेतृत्त्वाच्या अपेक्षा केल्या जात आहेत, त्या राहुल गांधींनी अण्णांच्या उपोषणाच्या अकराव्या दिवशी अचानक अण्णांना धन्यवाद देण्याच्या निमित्ताने पहिल्यांदा आपल्या वाणीला त्रास देण्याचा जो प्रयत्न केला त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावणे स्वाभाविक आहे. आज रस्त्यावर उतरून युवापिढी भ्र्रष्टाचार संपविण्याचा संकल्प घेत असताना एकट्या लोकपालामुळे…

भ्रष्टाचाराची यात्रा

(22 नोव्हेंबर 2011 रोजी प्रकाशित लेख)भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची जनचेतना यात्रा संपली असली तरी देशातील भ्रष्टाचाराची यात्रा अजून संपलेली नाही आणि म्हणूनच यात्रा संपली तरी संघर्ष संपलेला नाही, अशी घोषणा करण्यात आली. या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात भाजपाचे नव्हे रालोआचे सर्व खासदार आमच्याकडे काळा पैसा नाही, असे संसदेला लिहून देणार आहेत. रालोआच्या खासदारांनी असे लिहून…

फेसबुक आणि कृष्ण

(19 डिसेंबर 2011 रोजी प्रकाशित लेख)अन्य देशात तयार झालेल्या फेसबुकच्या वापरावर नियंत्रण आणण्याची भाषा फक्त केंद्र सरकार करत नाही तोच अवघं भारतीय समाजमन ढवळून निघतं आणि तिकडे भारताचा गौरव, भारताचा आत्मा असलेल्या भगवतगीतेवर रशिया आणि सिरिया या राष्ट्रांत बंदी आणण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होते, तरीही आम्ही गप्प राहतो. माहिती तंत्रज्ञानाच्या या युगाची ही फार मोठी…

माध्यम भाषा

(7 फेब्रुवारी 2012 रोजी प्रकाशित लेख)ज्यातून भावनांची अभिव्यक्ती योग्य प्रकारे होते आणि त्या भावना संभाषणातून एका हृदयातून दुसर्‍या हृदयात अचूकतेने पोहोचतात, त्यालाच भाषा संबोधणे योग्य ठरेल. भाषा कशाला म्हणतात, असा प्रश्न कुणी विचारला तर त्याची सोपी व्याख्या अशीच व्हायला हवी. अ.भा. मराठी साहित्य संमेलनात मराठीच्या दुरवस्थेला माध्यमेच जबाबदार आहेत काय, या विषयावर एक परिसंवाद आयोजित…

‘मलाला’ को सलाम!

(28 ऑक्टोबर 2012 रोजी प्रकाशित लेख)तालिबान. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात घट्ट पाय रोवलेली अतिरेकी संघटना. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशानेही ज्या संघटनेपुढे हात टेकले, त्या तालिबानविरुद्ध आवाज बुलंद करण्यासाठी 14 वर्षांची एकमुलगी समोर येते आणि तालिबान्यांच्या छातीत धडकी भरवते, ही घटना जगात घडली नसेल. मलाला युसूफजई हे त्या रणरागिणीचे नाव. किती भीती निर्माणव्हावी तालिबान्यांच्या मनात? शेवटी तिचा प्राण…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.


Follow My Blog

Get new content delivered directly to your inbox.