(11 जून 2012 रोजी लिहिलेला लेख)
वर्षातून केवळ एकदा पितरांना स्मरण करण्याचा प्रघात आजवर होता. पण, आता जिवंत असलेल्या प्रत्येकालाही स्मरण करण्यासाठी एकाच दिवसाची तरतूद दिसून येते. अशा स्मरणयात्रेच्या आजच्या युगात, आजचा क्रमांक समुद्र अर्थात महासागराचा लागतो. मातृदिन, पितृदिन, प्रेमदिन असे कितीतरी दिवस साजरे करून, त्या भावनेला एकाच दिवसात रूपांतर करून, त्याच्या कक्षा अरुंद करण्याचे काम समाजधुरिणांनी केले. वर्षभर रानटी वागण्याचा जणू परवानाच यातून देण्यात आला. आईवर प्रेम एकच दिवस करायचे आणि तिला बरे वाटावे म्हणून मातृदिनी केक कापायची, ही संस्कृती अनेकांना अमान्य असली, तरी काळाच्या ओघात ती प्रत्येक घरात शिरू पाहतेय्, हे मान्यच करावे लागेल. तसाच आजचा मान समुद्राचा. आज जागतिक समुद्रदिन. आपल्या महाराष्ट्रात मुंबईला समुद्र आहे. फिरायलाच जायचे असेल, तर गोव्यालाही समुद्र आहे. समुद्र म्हटला की, प्रत्येकाला आवडतो तो किनारा अर्थात बीच.
या समुद्राचे उदर हा शास्त्रज्ञांच्या शोधाचा विषय, तर या समुद्रातून मिळणार्या प्राण्यांमुळे अवघा समुद्रच मानवाच्या उदराचा विषय बनला आहे. समुद्र जितका विशाल, तितका त्याचा व्यापही विशाल आहे. आज भारतातील १५ टक्के जनता या समुद्राच्या अर्थकारणामुळे जिवंत आहे. त्यामुळेच भारताच्या सकल घरेलू उत्पादनात समुद्राने दोन टक्क्यांचा भार उचलला आहे. कोणत्याही क्षेत्रात अति केले की तेथे माती होतेच, तसेच आताशा समुद्राचेही झाले आहे. समुद्रावरचा मानवी भार इतका वाढला आहे की, आगामी काही वर्षांत हा सारा व्यवसाय धोक्यात येण्याचा इशारा सांसदीय समितीने देऊन टाकला आहे. नुकतीच यवतमाळात कृषी संदर्भात एक सांसदीय समिती भेट देऊन गेल्याचे तुम्हाला स्मरत असेल. त्याच समितीचे अध्यक्ष खा. वासुदेव आचार्य यांनी हा अहवाल जारी केला आहे. एकट्या समुद्रीप्राण्यांतून आज जवळजवळ ४३ हजार कोटींचा व्यवसाय होतो आहे. एवढेच नाही, तर तीन अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके विदेशी चलनही याच व्यवसायातून भारताला प्राप्त होत आहे. हा व्यवसाय २०१५ पर्यंत सहा अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका होईल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
माणसाचं आणि देशाच्या अर्थकारणाचं पोट भरत असलं, तरी मोठ्या प्रमाणात मत्स्यव्यवसायामुळे पर्यावरणाचा मात्र समतोल ढासळतोय्, याची कुणालाही पर्वा राहिलेली नाही. आजच्या जगण्याचा विचार करून माणूस मोकळा होतोय्. त्याला उाची अजीबात पर्वा राहिलेली नाही. उाच्या पिढीसाठी आम्ही काय सज्ज ठेवणार आहोत, याचा त्याला विचारच येत नाही. या व्यवसायामुळे समुद्राला अवकळा येत असतानाच, वीज उोगातून सोडले जाणारे उष्ण पाणी, शहरातील सांडपाणी, उोगांतून प्रदूषित पाणी, रसायनयुक्त पाणी यामुळे अनेक दुर्मिळ प्रजाती आता नष्ट होऊ पाहत आहेत. जगाची आकडेवारी तपासली तर ३५ टक्के माशांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. लोक असेच मासे खात राहिले, तर मासेच न मिळण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे मत्स्योत्पादनाला सरकारकडून मोठ्या प्रमाणात सब्सिडी दिली जात असल्याने या व्यवसायात येणार्यांची संख्या सातत्याने वाढते आहे. त्यामुळे समुद्राच्या उदराचा समतोल बिघडला आहे. सातत्याने मांस खाणार्यांसाठी कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब कमी करणारी औषधं बाजारात विक्रीला आली. पण, समुद्राचे पोट बिघडून त्याच्यासाठी मात्र एकही औषधाचं दुकान उघडलेलं नाही, ही त्याची व्यथा आहे.
दुसरीकडे पर्यावरणाचा र्हास होत असताना समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढते आहे. जणूकाही आम्ही सारे विनाशाच्या तारखेची वाट पाहत गप्प आहोत. १९९० पासून समुद्रातील पाण्याची पातळी ३.५ इंचाने वाढण्याचा प्रवास सुरू झाला आणि इ.स. २१०० पर्यंत ती ३४ इंच वाढेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. गंगा, कृष्णा, गोदावरी, कावेरी आणि महानदी यालाही अपवाद नाही. नांचीही हीच स्थिती आहे. एकूणच मित्रांनो, एक दिवस का होईना, पण या महासागराच्या उदराची काळजी घ्या. आपले आरोग्य जपताना त्या समुद्राचेही आरोग्य जपा. पर्यावरणाला हातभार लावा. कमीत कमी प्रदूषण होईल, याची काळजी घ्या. बीच घरापासून दूर असेल तरच त्याची गंमत असते, तरच ते पर्यटन असते. बीच उा तुमच्या अंगणात आला, तर दुसरे घर शोधावे लागेल. तेव्हा सावध व्हा!