(2 जुलै 2012 रोजी लिहिलेला लेख)
प्राचीन आणि आधुनिक हा वाद समाजाच्या बहुतेक क्षेत्रात आहे. त्याचा मेळ जे जुळवतात, ते सुखी असतात आणि जे एकालाच चिटकून बसतात, ते आयुष्याच्या कोणत्याही पातळीवर आणि कोणत्याही क्षेत्रात प्रगतीपासून वंचितच राहतात. व्हॉट वूई हॅव डन’ पेक्षा व्हॉट वूई कॅन डू’ चीच लढाई रोचक आणि यशाकडे नेणारी असते. आजचा विषय पावसाचा. पावसाचे आराखडे बांधणारे हवामान खाते बोगस आहे की काय, अशी शंका घेण्याइतपत वातावरण राज्यात तयार झाले होते. राज्याचे कृषीमंत्रीही खुद्द याच तर्हेने बोलू लागले होते. तीन दिवसांपूर्वी मुंबईत धो-धो पाऊस बरसला आणि शनिवार-रविवारी विदर्भातही पावसाचे चांगले आगमन झाले. हा पाऊस समाधानकारक असला तरी पुरेसा नाही. पण, येणार्या काळात तीही कसर भरून निघेल. अशात एकट्या हवामान खात्याला दोषी धरणे मात्र योग्य नाही.
यंदा भरपूर पाऊस येईल, असा प्रारंभीचा या खात्याचा अंदाज होता. नंतर तो थोडा कमी करण्यात आला. ९९ ते १०२ टक्क्यांचे ९३ ते १०० टक्के झाले. येथे एक बाब ध्यानात घेतली पाहिजे की, कमी दाबाचे पट्टे, वादळं, मान्सूनचे ढग सकाळी जसे दिसले, तसे अंदाज येतात. पण, हवा एकाच दिशेने वाहत नसते, ती सातत्याने बदलत असते. आज विदेशात जितके निरीक्षण केंद्र आहेत, तितके भारतात नाहीत. निरीक्षण केंद्रातील अंतर कितीतरी पटीने अधिक आहे. त्यातल्या त्यात भारत आणि चीन येथील मान्सूनचे अंदाज हे अतिशय कठीण असतात. समुद्राशी संबंध असलेले अंदाज लगेच वर्तविता येतात. भारताच्या बाबतीत मान्सूनचा विचार करायचा झाला तर दक्षिणेकडे ३० अंश आणि पूर्वेकडे ५० अंश मेसकॅरन हाय’ तयार होणे आवश्यक आहे. त्याची तीव्रता ७० ते ८० अंश इतकी असणे आवश्यक आहे. आफ्रिकेच्या पूर्व किनार्यावर ती जाऊन आदळते आणि तेव्हाच दक्षिण-पश्चिम अर्थात नैर्ऋत्य मान्सून तयार होतो. मान्सून तयार झाल्यावर त्याच्या दोन शाखा तयार होतात आणि यातील बंगाल उपसागरातील घडामोडी नागपूर-विदर्भावर परिणाम करणार्या असतात.
आज हवामान खात्याच्या अंदाजाला दोष देण्यात आणि हवामान खात्याचे अंदाज खोटे ठरावे, अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठीही आपणच आघाडीवर आहोत. जमिनीची धूप आता उरलीच नाही. मान्सून खेचून आणण्यासाठी जो ङङ्गहिट लो’ लागतो, तो निर्माणच होणार नाही, अशी व्यवस्था बदलत्या जीवनशैलीने करून ठेवली आहे. पायाला चिखलही लागू नये, म्हणून सिमेंट रस्ते बांधून थकलो नाही, तर त्या रस्त्यापासून फुटपाथपर्यंत सिमेंटचे ओटे बांधून बसलो. सिमेंटच्या या ओट्यावरूनही घराच्या अंगणातही चिखल नसावा, म्हणून अंगणही सिमेंटचे करून टाकले. पाणी मुरायला जागा नाही आणि जलसंवर्धनावरील भाषणबाजीत आम्हाला रस आहे. एखाा पुस्तकांतून सांगावे, असे आमच्याकडचे ऋतुचक्र आता तसे राहिलेच नाही. ङङ्गउन्हाळा, हिवाळा अन् पुन्हा पावसाळा’ हे गीत गुणगुणणे थांबवावे लागतेय्. पूर्वी हवामान ठरलेले असायचे. आता तर मान्सूनच्या पोषक स्थिती तयार होतात. पण, त्या असरच दाखवित नाही. या खात्याच्या देशभरातील शास्त्रज्ञांना एकत्र बसविण्याचे काम आपण कधी करतो काय? ङङ्गग्लोबल वॉर्मिंग’वरील उपाययोजनांवर चर्चेसाठी आम्हाला पश्चिमी वार्यांवरच अवलंबून रहावे लागते. केवढे मोठे हे दुर्दैव. पर्यावरणाचा असमतोल कधी नव्हे इतका आता आहे आणि तो दिवसेंदिवस वाढतच जाणार. दोन वाहने जाण्यासाठी रस्ता अपुरा पडला म्हणून आम्ही चौपदरीकरणाच्या मागे लागलो आणि रस्त्याच्या कडेला असलेली झाडे तोडू लागलो. एकट्या नागपूर-अमरावती मार्गावरची १६ हजार झाडे आम्ही तोडली. नवीन लागावी म्हणून न्यायालयात जावे लागले. झाडं जणू आमच्या विकासप्रक्रियेतील अडसर ठरली आहेत.
म्हणूनच नव्या विकासाचा वेध घेताना जुनी परंपरा जपली पाहिजे. रस्ते सिमेंटचे हवे असतील तर निदान फुटपाथ आणि अंगण मोकळे सोडले पाहिजे. आज प्रत्येक शहराचा जलस्तर खालावतोय्, त्याला हीच कारणं आहेत. आम्ही पाणी पिऊन जगणार आहोत की, सिमेंट खाऊन हे एकदा मनाशी ठरविले पाहिजे. पुढच्या लढाईत व्हॉट वूई कॅन डू’ याला आपल्या विचारांचे प्राधान्य असले पाहिजे. प्रदूषण कमी करण्यासाठी जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडवावे लागतील. औोगिकीकरण थांबणे शक्य नाही. मग त्यातील निघणार्या टाकावू मालाची विल्हेवाट सुनिश्चित केल्याशिवाय, त्याला परवानगी मिळता कामा नये. दळणवळणाची समान साधनं शोधावी लागतील. सार्वजनिक वाहतूक प्रणाली मजबुत करावी लागेल. नवीन झाडं वाढविल्याशिवाय जुन्या वृक्षांची कत्तल थांबविली पाहिजे. हे करताना विकास प्रक्रियेला जरा विलंब होऊ शकतो. पण, जगण्याचा विचार कधीही संकुचित असू शकत नाही. त्याला दीर्घकालीन नियोजनच उपयोगी पडतं. आपल्यानंतर येणार्या पिढीचा विचार विकासात अंतर्भूत नसणे ही आजच्या जीवनशैलीतील फार मोठी गोम आहे. आहे ते ओरबाडा, नवीन पिढी त्यांचे पाहील, हा दृष्टिकोन दीर्घकालीन यश कधीही देऊ शकणार नाही.