(सप्टेंबर 2012 मध्ये लिहिलेला लेख)
केंद्रातील अनेक बडे नेते डावलून सोनिया गांधींनी महाराष्ट्रातील सुशीलकुमार शिंदेंना केंद्रात गृहमंत्रिपद दिले, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण, आपली निवड कशी सार्थ आहे, हे अखेर सुशीलकुमार शिंदेंनी मॅडमला पटवून दिले आहे. देशाचा गृहमंत्री हा केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा धनी नसतो, तर तो देशातील गुन्हेगारीलाही तितकाच दोषी असतो. म्हणूनच तर कुठलाही अतिरेकी हल्ला झाल्यानंतर सर्वांत आधी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो. आता हेच पहा ना. देशात कोळसा घोटाळ्याचा काळाकूट्ट धूर सा सर्वत्र दिसत आहे. या धुराळ्यात देशाचा गृहमंत्री काय म्हणतो माहिती आहे… ङङ्गकोळशाने हात कितीही काळे झाले तरी ते हँडवॉश’ने धुता येतात.’ एखाा साहित्यिकाने आपल्या लिखाणाचे कौतूक व्हावे, म्हणून ज्ञात शब्दसंपदा वापरून केलेली साहित्यकृती हे आजकाल साहित्य मानले जात असले तरी त्याला भावनांचा स्पर्श असल्याशिवाय पूर्णत्त्व प्राप्त होत नाही. ख्यातनाम कवि नारायण सुर्वेंच्या स्मृत्यर्थ आयोजित कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदेंना संपुआच्या लाचारीचे काव्य सूचले आणि त्यांनी हे विधान करून टाकले.
शिंदे म्हणाले, देशात एकेकाळी बोफोर्स घोटाळा झाला होता. पण, जनता तोही विसरलीच ना. मग कोळसा विसरायला असा कितीसा वेळ लागणार आहे. देशात अनेक घोटाळे झाले. त्यापैकी किती जनतेच्या स्मरणात आहेत? संसदेची कोंडीही अनेकदा झाली आहे. पुढच्या अधिवेशनात संसद चालेल.’ निगरगट्ट आणि निर्लज्जपणा किती नसावा, याचे मापदंड कदाचित यातून ठरविता येतील, इतके कळकट्ट हे विधान आहे. शिंदेंचे हे टाकावू विधान जनतेला गृहीत धरणारे आहे. जनादेशाचा अपमान करणारे आहे. जनतेने मोठ्या विश्वासाने यांना निवडून ायचे आणि या नेत्यांनी त्यांचा विश्वासघात करायचा, असाच काहीसा हा प्रकार आहे. जनतेची स्मरणशक्ती अल्प असते, हे खरेही आहे. पण, त्याचा कायमस्वरूपी लाभ घेता येत नाही. एकपक्षीय अंमल संपून खिचडी सरकारचे युग आले आहे. उा काँग्रेस नेस्तनाबूत होईल आणि कधीतरी या देशात काँग्रेस पक्ष होता, असा इतिहास सांगावा लागेल, अशी स्थिती येण्यास यामुळे फार वेळ लागणार नाही. काँग्रेसची वाटचाल त्यादिशेने केव्हाच प्रारंभ झाली आहे, असे अनेक नेते म्हणतात, त्यामागे हीच कारणे आहेत. स्वातंत्र्यापूर्वीपासूनच्या एका राष्ट्रीय पक्षाच्या पतनाचे वाटेकरी हीच मंडळी असतील. जेव्हा राजा जनतेला गृहित धरू लागतो, तेव्हा त्याचा अस्त जवळ आलेला असतो, हे लक्षात घेतले पाहिजे. शिंदेंचे हे विधान त्याचेच ोतक आहे. साहित्यात भावना नसतील, तर ते साहित्य सदासर्वकाळ स्मरणात राहत नाही. तसेच शिंदेंच्या या विधानात ङङ्गसु’पीक डोके असले तरी त्यात शील’ कुठेही नाही. काँग्रेस पक्ष आपले शील गमवित चालला आहे, हेच यातून दिसून येते.
सरकारने दडपशाहीचे, मग्रूरीचे, खाऊन-पिऊन गरिबांच्या नावाने ढेकर देण्याचे जे धोरण पत्करले आहे, त्याला जनताच योग्य उत्तर देईल. उत्तम गृहमंत्री निवडल्याच्या अविर्भावात सोनिया जरुर असतील. पण, आपल्या घराण्याची शान असलेल्या पक्षाचा अंतिम प्रवास अधिक वेगवान करणारा हा नेता आहे, याची जाण त्यांना आज नाही. कलियुग कशाला म्हणतात, हे आता इतरांकडून शिकण्याची गरज नाही. जनतेचेच खाऊन जनतेचीच खिल्ली उडविणारे असे नेते त्याचीच साक्ष देत आहेत. सत्याचा, संस्कृतीचा, संस्कारांचा हा अंत वाटत असला तरी मित्रांनो, चांगल्या काळाचा प्रारंभबिंदूही आता दृष्टिपथात येईल. कारण प्रकाशाची वाट अंधारातूनच दिसत असते. अनेक वर्षांची कुजलेली घाण लगेच स्वच्छ होत नसते. कचरा काढून त्या जागेला वाळू ावे लागते. वाळल्यानंतर पुन्हा थोडी माती उकरून काढावी लागते. तेथे नवीन माती टाकावी लागते. त्या जागेकडे बघण्याचा जनतेचा दृष्टिकोन बदलावा लागतो. नंतर तेथे जे उगवते, त्याचा स्तर अनेक वर्ष टिकवावा लागतो. तीच स्थिती आज देशात आहे. हा कचरा लवकरच स्वच्छ होईल, यात वाद नाही.