(28 ऑक्टोबर 2012 रोजी प्रकाशित लेख)
तालिबान. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात घट्ट पाय रोवलेली अतिरेकी संघटना. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशानेही ज्या संघटनेपुढे हात टेकले, त्या तालिबानविरुद्ध आवाज बुलंद करण्यासाठी 14 वर्षांची एकमुलगी समोर येते आणि तालिबान्यांच्या छातीत धडकी भरवते, ही घटना जगात घडली नसेल. मलाला युसूफजई हे त्या रणरागिणीचे नाव.
किती भीती निर्माणव्हावी तालिबान्यांच्या मनात? शेवटी तिचा प्राण घेण्यासाठी मलाला हिला लक्ष्यकरून तिच्यावर दोन गोळ्या झाडल्या. अल्लाची कृपा, डॉक्टरांची दवा आणि जगभरातील समस्त जनतेने केलेली दुवा यामुळे मलाला सध्या धोक्याच्या बाहेरआहे, हे ऐकून जनाजनांच्या मनाला हायसे वाटले. पण, नापाक इरादे नसतील तर ते तालिबानी कसले? अजूनही त्यांच्या मनातील मलाला नावाचे भय दूरझालेले नाही. “अगर वो जिदा बची तो फिर हमला करेंगे और जानसे मारडालेंगे,” ही धमकी त्यांनी पुन्हा दिली आहे. मलालावर झालेल्या हल्ल्याच्याविरोधात संपूर्ण पाकिस्तानसह अवघे जग उठून उभे राहिले. भारतातही अनेकठिकाणी मलालाला समर्थन देण्यासाठी आणि तिच्या जलद स्वास्थ्याची कामनाकरण्यासाठी मुस्लिम बंधू-भगिनींनी मोर्चे काढले, निदर्शने केली आणि आम्हीमलालासोबत आहोत, याचा आगाज केला. पाकिस्तानातील हिदू महिलांवरचकेवळ अत्याचार होत नाहीत, तर पाकिस्तानमध्ये मुस्लिम मुलींवरही कसेअत्याचार केले जातात, हे जगाने एकदा उघड्या डोळ्याने पाहिले, हे एकाअर्थाने सकारात्मकदृष्ट्या बरेच झाले. भारतात अगदी निर्धोक वातावरणातराहणारया आमच्या तथाकथित मुुस्लिम नेत्यांनी यापासून धडा घेतला पाहिजे आणि भारतच जगात सर्वांत सुरक्षित देश म्हणून गोडवे गायची हिमत दाखविलीपाहिजे. आज भारतातील मुस्लिम मुलींना कोणतेही शिक्षण घेण्यास मुभा आहे. त्यासाठी कोणतीच आडकाठी नाही. पण, मलालासारख्या बालिकेने केवळशिक्षणाचा पुरस्कार केला म्हणून तिला किती भयानक छळांचा सामना करावालागला, ही बाब भारतातील मुस्लिम नेत्यांनी ध्यानात ठेवली पाहिजे. आज संपूर्ण जगभर तालिबान्यांचा विरोध होत आहे, निषेधार्थ मोर्चे निघत आहेत.
त्यात सर्व मुस्लिम देशांचाहीसमावेश आहे. हा एकचांगला संकेत म्हटला पाहिजे. पाकिस्तानच्या खैबरपख्तुनख्वा प्रांतात स्वातजिल्ह्यातील मंगोरा गावातराहणारी ही मुलगी. अफगाणिस्तानला लागून असलेला हा तालिबानबहुल भाग. बालवयापासूनच शिक्षणाची नितान्त आवड.पण, या प्रांतात मुलींनाशिक्षण घेण्यास बंदीघालणारा तालिबान्यांचा फतवा असल्याने मुली घाबरत होत्या. तालिबान्यांनी टीव्ही आणि संगीतावरही बंदी घातली होती. अशा प्रतिकूल स्थितीत मलालाने पुढाकार घेऊन सर्व मुलींमध्ये एक विश्वास निर्माण केला आणि अध्ययनासोबत अध्यापनही सुरू केले. अनेकदा या प्रांतातील शाळा तालिबान्यांनी स्फोटाने उडवून दिल्या होत्या. तरीही अदम्य आत्मविश्वास असलेली मलाला घाबरली नाही. नव्या दमाने तिने पुन्हा मुलींना तयार केले. वय अवघे अकरा असताना, बीबीसीच्या उर्दू सेवा विभागाने मलालाचा ब्लॉग तयार करून दिला. याब्लॉगवर खैबर प्रांत आणि स्वात खोरयात तालिबान्यांच्या दहशतीखाली लोककसे जीवन जगत आहेत, त्यांना किती अडचणी आणि अत्याचारांचा सामना करावा लागत आहे, प्रामुख्याने मुलींच्या शिक्षणावर घातलेल्या बंदीमुळे याभागात शिक्षणाची किती नितान्त गरज आहे, अशा सर्व विषयांवर मलालाने आपले विचार व्यक्त करणे सुरू केले. या ब्लॉगवरील तिच्या लिखाणामुळेतालिबान्यांच्या काळ्या कृत्यांची माहिती जगाला कळू लागली. तालिबान्यांनीस्वात जिल्ह्यातील शंभरावर शाळा उद्ध्वस्त केल्या होत्या. त्यामुळे अनेक कुटुंबांनी पेशावर, लाहोर आणि रावळपिडीला आपले बस्तान हलविले होते. मलाला मात्र घाबरली नाही. पाकिस्तानी सैन्य आणि तालिबान्यांमध्ये अनेकदाधुमश्चक्री उडाली. त्याचे आवाज कानठळ्या बसविणारे असले, तरी मलालाडगमगली नाही. एका शांतता रॅलीचे वार्तांकन करताना, पाकिस्तानी पत्रकार मारला गेला. त्यानंतर तालिबान्यांनी मुलींच्या शिक्षणावरील बंदी उठविली खरी, पण बुरखा अनिवार्य केला. मलालाला 2011 साली तिच्या शिक्षणक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी इंटरनॅशनल चिल्ड्रेन पीस पुरस्कार आणि सोबतचपाकिस्तानचा युथ पीस पुरस्कार प्रदान करण्यात आला. एका माध्यमिक शाळेलामलालाचे नावही देण्यात आले. दरम्यानच्या काळात न्यूयॉर्क टाईम्ससह अनेक वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्यांना मलालाने मुलाखती दिल्या. त्या एवढ्या गाजल्या की, तालिबान्यांनी पाकिस्तानमध्ये कसा उच्छाद मांडला आहे, याचे दर्शन संपूर्णजगाला झाले. अनेक संघटनांनी या घटनांची नोंद घेतली नसती तरच नवल. मगमलालाच्या लिखाणावर तालिबान्यांच्या विरोधात लेख प्रकाशित होऊ लागले. मलाला आता केवळ उर्दू भाषेपुरती मर्यादित राहिली नव्हती. आंतरराष्ट्रीय पातळीवर तिचे नाव गाजू लागले. तालिबानविषयी जनमत कलुषित होऊ लागले. तालिबान्यांना या सर्व माहितीने अस्वस्थ करून सोडले आणि त्यांनी मलालाला ठार मारण्याचा कट रचला. नुकत्याच 9 ऑक्टोबर रोजी मलालास्कूल बसमधून आपल्या घराकडे निघाली असता, तालिबान्यांनी बस अडवूनतिला जवळून दोन गोळ्या झाडल्या. एक मानेला आणि एक डोक्याला लागली. महत्प्रयासाने तिचा जीव वाचविण्यात पाकिस्तानच्या डॉक्टरांना यश आले. पण,मलालावर केलेल्या हल्ल्याची एवढी तीव्र आणि जगभर प्रतिक्रिया उमटेल,याची कल्पना तालिबान्यांनाही आली नसेल. संपूर्ण जगभरातून निषेधाचा आगडोंब उसळला. तालिबानी किती कायर आणि डरपोक आहेत, हेही जगालाकळले. पाकिस्तानातील अनेक संघटनांकडून मलालावर हल्ला करणारयांनापकडून देणारयास मोठमोठी बक्षीसे जाहीर करण्यात आली. 50 मौलवींनी तालिबान्यांविरोधात फतवा काढला. संपूर्ण पाकिस्तानात संतापाची लाट उसळली. तालिबान्यांचे खरे रूप जगासमोर आले. जगाच्या अन्य भागात राहणार्या मुस्लिम समुदायांचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले. आपण आपल्याप्रदेशात किती सुरक्षित आहोत, आपल्या मुली कशा मुक्तपणे शिक्षण घेऊशकतात, याची कल्पना आली असेल. भारतात राहणारयांना तर आलीच आलीअसेल. मुस्लिमांमध्ये शिक्षणाचे प्रमाण संपूर्ण जगात कमी आहे. भारतासारख्या120 कोटी लोकसंख्येच्या या देशातही मुलींच्या शिक्षणाबद्दल आनंदीआनंदआहे. पाकिस्तानला आता कुठे शिक्षणाचे महत्त्व कळू लागले, हेही नसे थोडके!पाकिस्तानने मलाला हत्या प्रयत्न प्रकरणापासून आपली भूमिका जागतिकव्यासपीठासमोर स्पष्ट केली पाहिजे. त्यांना सर्वांसाठी शिक्षण हवे आहे, कीसर्वांसाठी तालिबान्यांच्या बंदुका, याचा निर्णय जाहीर रीत्या सांगितला पाहिजे.कारण, तालिबान्यांना काही प्रकरणांत तर आयएसआयने मदत केल्याची उदाहरणे आहेत. आज पाकिस्तानमधील प्रत्येक मुलगी सर्व दृष्टीने साक्षरझाली, तर पाकिस्तानमध्ये एक नवी क्रांती उदयास येऊ शकते. पण, त्यासाठी तालिबान्यांचा खात्मा करावा लागेल. कठोर निर्णय घ्यावे लागतील. पाक-अफगाण सीमेवरील भागात प्रामुख्याने तालिबान्यांचा वावर अधिक आहे. यांनापाक आवर घालणार आहे का? एकट्या मलालाच्या धाडसाने या प्रश्नाचे उत्तरमिळणार नाही. त्यासाठी पाकिस्तानात लाखो मलाला निर्माण कराव्या लागतील. स्त्रीशिक्षणासाठी काम करणारया संघटनांना प्रोत्साहन द्यावे लागेल.आज मलाला ही केवळ पाकिस्तानचीच नव्हे, तर संपूर्ण जगाची अभिनव रोलमॉडेल झाली आहे. ती लवकरच ठणठणीत होवो, अशा शुभेच्छा!