फेसबुक आणि कृष्ण

(19 डिसेंबर 2011 रोजी प्रकाशित लेख)अन्य देशात तयार झालेल्या फेसबुकच्या वापरावर नियंत्रण आणण्याची भाषा फक्त केंद्र सरकार करत नाही तोच अवघं भारतीय समाजमन ढवळून निघतं आणि तिकडे भारताचा गौरव, भारताचा आत्मा असलेल्या भगवतगीतेवर रशिया आणि सिरिया या राष्ट्रांत बंदी आणण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होते, तरीही आम्ही गप्प राहतो. माहिती तंत्रज्ञानाच्या या युगाची ही फार मोठी […]

Continue Reading

माध्यम भाषा

(7 फेब्रुवारी 2012 रोजी प्रकाशित लेख)ज्यातून भावनांची अभिव्यक्ती योग्य प्रकारे होते आणि त्या भावना संभाषणातून एका हृदयातून दुसर्‍या हृदयात अचूकतेने पोहोचतात, त्यालाच भाषा संबोधणे योग्य ठरेल. भाषा कशाला म्हणतात, असा प्रश्न कुणी विचारला तर त्याची सोपी व्याख्या अशीच व्हायला हवी. अ.भा. मराठी साहित्य संमेलनात मराठीच्या दुरवस्थेला माध्यमेच जबाबदार आहेत काय, या विषयावर एक परिसंवाद आयोजित […]

Continue Reading

मान्सूनचे आगमन 28 मे की 6 जूनला?

(जून 2014 मध्ये प्रकाशित) सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मान्सूनच्या लहरीपणाबाबत जितकी चर्चा होते, तितकी दुर्दैवाने हवामान खात्याच्या लहरीपणाबाबत होताना दिसून येत नाही. म्हणूनच यंदाचा मान्सून 28 मे रोजी आला की 6 जून रोजी असा प्रश्न पडला आहे.साधारणपणे केरळातील 14 विभागांपैकी 60 टक्के परिसरात सलग दोन दिवस 2.5 मि.मी. पाऊस झाला की त्याच्या दुसर्‍या दिवशी मान्सूनचे […]

Continue Reading

पहिला पाऊस…

पावसाचं असंच असतं. माणूस विज्ञानवादी असावा की नसावा, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण, काही विषयांना विज्ञानाच्या निकषात बांधता येत नाही, हेही तितकंच खरं. िकबहूना कुठे विज्ञानाचे निकष लावावे आणि कुठे लावू नयेत, याचं भान पाळता आलं की, निराशा पदरी पडत नाही. आता हेच बघा ना, यंदा मान्सून लवकर येणार, अशी जोरदार भविष्यवाणी झाली. […]

Continue Reading
balasaheb

बाळासाहेब गेले, पुढे काय?

(नोव्हेंबर 2012 मध्ये लिहिलेला लेख) मृत्यू हा अपरिहार्य आहे. ते जीवनातील अंतिम सत्य आहे. महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या राजकारणात देवत्त्व प्राप्त झालेल्या फार थोडक्या नेत्यांपैकी बाळासाहेब ठाकरे एक. जेथे देशातील सर्वाधिक बुद्धीमान लोक राहण्याचा दावा केला जातो, अशा दक्षिणेत अनेक नेते, अभिनेत्यांची देवळं बांधली जातात. बाळासाहेबांची महाराष्ट्रात कुठेही देवळं बांधली गेली नाही. पण, भरकटलेला तरुण िंहदूत्त्वाच्या […]

Continue Reading

आरोग्यपेठ

(सप्टेंबर 2012 मध्ये लिहिलेला लेख) नागपुरातील प्रतापनगर चौकात असलेल्या औषधी दुकानांच्या बाहेर एक सुंदर तरुणी अचानक तुम्हाला गाठेल आणि आपल्या हेल्थ क्लबची जाहिरात हाती देईल. काय खावे, कसे खावे, कोणता व्यायाम करावा याचे मार्गदर्शन तुम्हाला हवे आहे, हे पटवून देईल आणि एका मोफत प्रोटीनयुक्त नाश्त्याच्या मोहात लोकही अलगद तिच्या (हेल्थ क्लब) जाळ्यात अडकतील. माणूस स्वतःला […]

Continue Reading

सु’पीक डोके, शील’ कोठे?

(सप्टेंबर 2012 मध्ये लिहिलेला लेख) केंद्रातील अनेक बडे नेते डावलून सोनिया गांधींनी महाराष्ट्रातील सुशीलकुमार शिंदेंना केंद्रात गृहमंत्रिपद दिले, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण, आपली निवड कशी सार्थ आहे, हे अखेर सुशीलकुमार शिंदेंनी मॅडमला पटवून दिले आहे. देशाचा गृहमंत्री हा केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा धनी नसतो, तर तो देशातील गुन्हेगारीलाही तितकाच दोषी असतो. म्हणूनच तर […]

Continue Reading

विकृती

(सप्टेंबर 2012 मध्ये लिहिलेला लेख) आपल्या देशातील चर्चा आणि वादळं ठरवून होतात की काय, हा गंभीर चिंतनाचा विषय अनेकांना वाटू शकतो. पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान, राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्याने शर्ट काढला, तर त्या पक्षावर, त्यांच्या संस्कृतीवर, त्यांच्या नेत्यांवर कोणत्याही प्रकारची विपरित टिप्पणी माध्यमांमध्ये झाली नाही. कारण, टीका टाळता येईल, अशाप्रकारच्या आचरणाची किंवा संस्कृतीची त्यांच्याकडून अपेक्षाच कुणी करीत […]

Continue Reading
legal

‘झोप’झाप

(28 ऑगस्ट 2012 रोजी लिहिलेला लेख) झोप हा तसा प्रत्येकाचा खाजगी विषय. कुणी किती वेळ झोपावे आणि किती वेळ नाही, याचे प्रत्येकाचे स्वतंत्र मापदंड असू शकतात. झोप ही प्रत्येकाच्या जीवनशैलीशीसुद्धा निगडित असते. अतिमेहनत करणारी व्यक्ती भरपूर झोप घेते आणि कमी मेहनत असेल, तर थोडकीही झोप तिच्यासाठी पुरेशी असते. झोपेवर अनेक संशोधने नव्यानेही झाली आहेत. पूर्वी […]

Continue Reading

कर्ज-समृद्धी-विनाश!

(20 ऑगस्ट 2012 रोजी लिहिलेला लेख) माणूस एकदा कर्जबाजारी झाला की, त्याचा विनाश अटळ असतो, असे जुने लोक सांगायचे. सावकारांच्या बाबतीत ते तंतोतंत लागू पडणारे मत होते. पण, काळ बदलला. सावकारांची जागा बँकांनी घेतली आणि कर्ज हे विनाशाऐवजी समृद्धीचे लक्षण मानले जाऊ लागले. आयुष्यातील प्रत्येकच गरजा पूर्ण करताना खेळते भांडवल जवळ नसते. त्यामुळे कर्ज काढून […]

Continue Reading