जवळजवळ आठ वर्षांनी स्वत:साठी लिहिण्याचा योग आलाय्. सरकारनामाने एका वेगळ्या विषयाच्या निमित्ताने ही संधी दिली, त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. पत्रकारितेत पाऊल ठेवले, ते ज्येष्ठ संपादक ल. त्र्यं. जोशी यांनी संधी दिल्याने. तत्पूर्वी ‘संपादकांना पत्रे’ किंवा ‘वाचकांचे मनोगत’ सारखे लेखन होत असायचे. अशाच एका भेटीत अक्षरं आणि भाषा आवडल्याने थेट नोकरीचा प्रस्ताव आला. पदवीचं शिक्षण […]
कान टोचायचे कुणी?
(14 नोव्हेंबर 2011 रोजी प्रकाशित लेख)कान कुणाच्या हाताने टोचले जावे, असा प्रश्न विचारला तर पटकन उत्तर मिळते, सोनाराकडून. दुसर्या कुणाकडून ते टोचले तर कदाचित त्यात काही त्रुटी राहू शकते. भारतातील विरोधी पक्ष आज एका सूरात केंद्रातील डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या अकार्यक्षमतेचा पाढा वाचत असताना त्यात कदाचित राजकारणाचा वास येऊ शकतो. पण, देशातील आघाडीचे सारेच उद्योजक जेव्हा […]
राहुल आजोबा
(27 ऑगस्ट 2011 रोजी प्रकाशित लेख)भ्रष्टाचाराविरोधात देशाभरातील तरूण रस्त्यावर उतरला असताना ज्यांच्याकडून भावी नेतृत्त्वाच्या अपेक्षा केल्या जात आहेत, त्या राहुल गांधींनी अण्णांच्या उपोषणाच्या अकराव्या दिवशी अचानक अण्णांना धन्यवाद देण्याच्या निमित्ताने पहिल्यांदा आपल्या वाणीला त्रास देण्याचा जो प्रयत्न केला त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावणे स्वाभाविक आहे. आज रस्त्यावर उतरून युवापिढी भ्र्रष्टाचार संपविण्याचा संकल्प घेत असताना एकट्या लोकपालामुळे […]
भ्रष्टाचाराची यात्रा
(22 नोव्हेंबर 2011 रोजी प्रकाशित लेख)भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची जनचेतना यात्रा संपली असली तरी देशातील भ्रष्टाचाराची यात्रा अजून संपलेली नाही आणि म्हणूनच यात्रा संपली तरी संघर्ष संपलेला नाही, अशी घोषणा करण्यात आली. या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात भाजपाचे नव्हे रालोआचे सर्व खासदार आमच्याकडे काळा पैसा नाही, असे संसदेला लिहून देणार आहेत. रालोआच्या खासदारांनी असे लिहून […]
‘मलाला’ को सलाम!
(28 ऑक्टोबर 2012 रोजी प्रकाशित लेख)तालिबान. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात घट्ट पाय रोवलेली अतिरेकी संघटना. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशानेही ज्या संघटनेपुढे हात टेकले, त्या तालिबानविरुद्ध आवाज बुलंद करण्यासाठी 14 वर्षांची एकमुलगी समोर येते आणि तालिबान्यांच्या छातीत धडकी भरवते, ही घटना जगात घडली नसेल. मलाला युसूफजई हे त्या रणरागिणीचे नाव. किती भीती निर्माणव्हावी तालिबान्यांच्या मनात? शेवटी तिचा प्राण […]
पवारी खेळी
(24 एप्रिल 2012 रोजी प्रकाशित लेख)अन्य कुठल्या पक्षाची असो वा नसो, राष्ट्रवादी काँग्रेसची 2014 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती तयार आहे. एकिकडे आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबतच राहण्याचे विधान करून राजकीय विश्लेषकांना गप्प बसण्यास सांगत असतानाच, राष्ट्रपतिपदासाठी मात्र निष्पक्ष उमेदवार देण्याचे आवाहन त्यांनी केले आणि एका दगडात दोन पक्षी मारले. असे काम पवारांसारख्या नेत्यांनीच करायचे असते. या […]
अनेक प्रधान
(1 जुलै 2013 रोजी प्रकाशित लेख)जगाला व्यवसायिक करण्याच्या भानगडीत लोक इतके व्यवसायिक केव्हा झाले हे ते त्यांनाही कळले नाही. जीवनात अनेक संधी निर्माण होत असतात. कधी ती संधी अपरिहार्यता असते तर कधी विकृतीची जागा. अकरावीच्या केंद्रीकृत प्रवेशाची यादी लागली. दहावीच्या परीक्षेत राज्य बोर्डातून पहिली आलेली विद्यार्थिनी या यादीत पंधराव्या क्रमांकावर आहे, तर त्यापूर्वीच्या 14 क्रमांकावर […]
भाजपाचे आणि नागपूरचेही पहिले मुख्यमंत्री
(1 नोव्हेंबर 2014 रोजी देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली मुलाखत) वडीलांचा आदर्श अन् 25 वर्षांचा अविरत संघर्षएक सामान्य कार्यकर्ता अशीच नवीन मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांची ओळख. राजकारणातील आदर्श स्व. गंगाधरराव फडणवीस अर्थात पिता. समाजकारणाचे बाळकडू घरातच मिळालेले. आणिबाणीच्या काळात आपल्या वडिलांना कारागृहात कुणी टाकले तर ते काँग्रेसने, हा बालमनावर झालेला आघात. त्यामुळे इंदिरा कॉन्व्हेंटमध्येही प्रवेश […]
पहिलम् प्यारा…
(1 नोव्हेंबर 2014 रोजी प्रकाशित लेख) अखेर तो दिवस उगवला. राज्याला नागपुरातून पहिला मुख्यमंत्री लाभला. भाजपाचा राज्यात प्रथमच मुख्यमंत्री होण्याचाही मान त्यांनाच मिळाला. विदर्भाला जवळजवळ 25 वर्षांनी मुख्यमंत्री लाभला. एक स्वच्छ, पारदर्शी, स्पष्टवक्ता आणि तितकाच लाघवी व्यक्तिमत्त्व लाभलेला हा नेता तसेही संपूर्ण नागपूरसाठी मानबिंदूच आहे. साधेपणा हा त्यांचा अंगीभूत गुण. एखादी गोष्ट होणार असेल तर […]