(सप्टेंबर 2012 मध्ये लिहिलेला लेख) आपल्या देशातील चर्चा आणि वादळं ठरवून होतात की काय, हा गंभीर चिंतनाचा विषय अनेकांना वाटू शकतो. पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान, राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्याने शर्ट काढला, तर त्या पक्षावर, त्यांच्या संस्कृतीवर, त्यांच्या नेत्यांवर कोणत्याही प्रकारची विपरित टिप्पणी माध्यमांमध्ये झाली नाही. कारण, टीका टाळता येईल, अशाप्रकारच्या आचरणाची किंवा संस्कृतीची त्यांच्याकडून अपेक्षाच कुणी करीत […]
‘झोप’झाप
(28 ऑगस्ट 2012 रोजी लिहिलेला लेख) झोप हा तसा प्रत्येकाचा खाजगी विषय. कुणी किती वेळ झोपावे आणि किती वेळ नाही, याचे प्रत्येकाचे स्वतंत्र मापदंड असू शकतात. झोप ही प्रत्येकाच्या जीवनशैलीशीसुद्धा निगडित असते. अतिमेहनत करणारी व्यक्ती भरपूर झोप घेते आणि कमी मेहनत असेल, तर थोडकीही झोप तिच्यासाठी पुरेशी असते. झोपेवर अनेक संशोधने नव्यानेही झाली आहेत. पूर्वी […]
कर्ज-समृद्धी-विनाश!
(20 ऑगस्ट 2012 रोजी लिहिलेला लेख) माणूस एकदा कर्जबाजारी झाला की, त्याचा विनाश अटळ असतो, असे जुने लोक सांगायचे. सावकारांच्या बाबतीत ते तंतोतंत लागू पडणारे मत होते. पण, काळ बदलला. सावकारांची जागा बँकांनी घेतली आणि कर्ज हे विनाशाऐवजी समृद्धीचे लक्षण मानले जाऊ लागले. आयुष्यातील प्रत्येकच गरजा पूर्ण करताना खेळते भांडवल जवळ नसते. त्यामुळे कर्ज काढून […]
हसतमुख अखेर!
(ऑगस्ट 2012 मध्ये लिहिलेला लेख) वयाची ६७ वर्षे पार केली तरी विलासरावांच्या एकूणच शरीरयष्टीकडे आणि त्यांच्या कार्यक्षमतेकडे पाहल्यानंतर त्यांचे वय तितके असेल, यावर कुणाचा सहसा विश्वास बसणे शक्य नव्हते. वय एकवेळ लपविता येईल, पण आजार लपविता येत नसतो. आज विलासराव आपल्यात नाहीत, यावर म्हणूनच विश्वास बसत नाही. महाराष्ट्राने एक हसतमुख व्यक्तिमत्त्व आपल्यातून हिरावून नेले आहे. […]
नंबर दोनचा प्रमेय
(ऑगस्ट 2012 मध्ये लिहिलेला लेख) एक, दोन, तीन, चार… अशी कितीही गणती करीत राहिले, तरी ती संपणार नाही. अवघ्या जगात आज गणितंच मांडली जातात. कुणाला श्रीमंतीच्या व्याख्येला गणितात बसवायचं असतं, तर कुणाला पोटाची खळगी भरण्यासाठी गणित मांडावं लागतं. माणूस आनंदात असला की तारखा मोजतो आणि दुःखात असला की वर्षं! आनंदात त्याला प्रत्येक दिवस साजरा करावासा […]
मंगळ प्रवास
(8 ऑगस्ट 2012 रोजी लिहिलेला लेख) ग्रहांचेही आपले एक सौंदर्य असते. कुणाला शुक्र भुरळ घालतो, तर कुणाला चंद्र. कुणाला कविता सुचतात, तर कुणाला पानभर लेख लिहावेसे वाटतात. लालचुटूक मंगळही याला अपवाद नाही. मंगळाचे रत्न मानले जाणारे पोवळे तर महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्राला शोभा देते. आज जरी फॅशन नसली, तरी खेड्यांमध्ये आजही मंगळसूत्रात पोवळे असतेच. मंगळाचा ज्योतिषशास्त्रदृष्ट्या […]
अनुभूती…दैवी कणाची!
(8 जुलै 2012 रोजी लिहिलेला लेख) खरोखर देव आहे काय? उत्तर येतं, माहिती नाही’. अनेक श्रद्धाळू सुद्धा आयुष्यातील अडचणींच्यावेळी हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारत असतात. श्रद्धा असतेच, पण ती कधी डळमळतेही. शेवटी माणूसच ना तो? शेवटी एकच क्रोसिन सर्वांवर सारखाच परिणाम करीत नाही. कधी ती ताप बरा करते, तर कधी ऍलर्जीला कारणीभूत ठरते. असे असले […]
लंडनला हवे अण्णा!
(2 ऑगस्ट 2012 रोजी लिहिलेला लेख) अण्णा रविवारी उपोषणाला बसले आणि पाहता-पाहता जंतरमंतरवरील गर्दी वाढू लागली. काही प्रांत ज्याचे त्यानेच सांभाळायचे असतात. प्रयोगशीलता वाईट नाही. पण, प्रयोगाची कालमर्यादा मात्र निश्चित असली पाहिजे. किरण बेदी, अरविंद केजरीवाल यांनी अण्णांना काही काळ विश्रांती घेण्यास सांगून केलेला प्रयोग लगेच सावरला गेला, ही आनंदाची बाब आहे. प्रश्न- अण्णा, केजरीवाल, […]
बंदीची दुसरी बाजू!
(17 जुलै 2012 रोजी लिहिलेला लेख) बंदी अर्थात सक्तीचे निर्बंध. त्याने समस्या सुटतात, असा दावा केला जातो. तो किती खरा आहे आणि किती खोटा, हे प्रत्येकाला ठावूक आहे. त्यामुळे त्यावर फार उहापोह करण्यात अर्थ नाही. काही प्रसंगात सक्ती आवश्यक असली तरी ती बहुतेक वेळा ज्वालामुखी बाहेर पडण्यास कारणीभूत ठरते, हा सामान्य अनुभव आहे. गेल्या आठवड्यात […]
आधुनिक भीष्म
(12 जुलै 2012 रोजी लिहिलेला लेख) असं म्हणतात की, इतिहास कायम घटनांची पुनरावृत्ती करीत असतो. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी अर्थखाते स्वतःकडे घेतल्यानंतर एकापाठोपाठ एक निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. भूक लागलेला ताट वाढल्यानंतर पटापट जेवतो, तशी त्यांची अवस्था आहे. अर्थमंत्री म्हणून प्रणव मुखर्जी यांनी राजीनामा देताच जणू त्यांच्या मार्गातील अडसर दूर झाला आणि त्यांना निर्णय […]